माझ्या मुलाचे प्राण जाण्यास डॉक्टरच जबाबदार !…

आई-वडिलांचा पत्रकार परिषदेत आरोप :-डॉक्टरवर कठोर कारवाई व्हावी

दर्यापूर शहर (किरण होले)
दर्यापूर शहरातील वसंत नगर येथे रहात असलेला तरुण युवक पंकज अंबादास चव्हाण वय 22 याला 26 फेब्रुवारी रोजी आजार आल्याने दर्यापूरातील सिव्हिल लाईन परिसरात असलेल्या माही हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी गेला होता. पंकज ने 26 पासून उच्चार घेण्यास सुरुवात केली

परंतु दिवसेंदिवस पंकज ची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडत गेली. डॉ. आर. पी चव्हाण यांनी पंकज वर जे उपचार करण्यात आले त्या उपचारामध्ये कुठल्याही प्रकारचा पंकजला आराम न मिळता पंकज ची तब्येत मोठ्या प्रमाणात बिघडत गेली. डॉक्टर यांनी पंकज वर केलेले उपचार हे हलगर्जीपणामुळे केले

असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पंकज चे प्राण गेल्याचा असल्याचा आरोप पंकज चे नातेवाईक व मित्रमंडळींनी केला होता. व यासंदर्भात डॉक्टर विरुद्ध दर्यापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली व उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे सुद्धा डॉक्टर चा परवाना रद्द करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली

होती. त्यानंतर डॉक्टर चव्हाण यांनी पत्रकार परिषद बोलावून मी पंकज वर केलेले उपचार हे व्यवस्थितपणे केले असून त्या उपचारांमध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा मी केलेला नाही व माझ्यावर जे काही आरोप होत आहे हे सर्व खोटे आहे असे मत डॉक्टर चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते.

परंतु सोमवार रोजी पुन्हा पंकज च्या आईवडिलांनी पत्रकार परिषदेत आयोजन करून डॉक्टर चव्हाण हे आमच्या कुटुंबातील एक सदस्य असून त्यांनी आमच्याच मुलाचे प्राण घेतले. अशा नालायक डॉक्टरला देव सुद्धा माफ करणार नाही.

आज आमच्या मुला चे प्राण डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे ग गेला असून भविष्यामध्ये अशी घटना पुन्हा घडू नये त्यासाठी अशा डॉक्टरवर कठोर कारवाई व्हावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पंकज च्या आई-वडिलांसह नातेवाईक व मित्र मंडळींनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. आता यावर वैद्यकीय अधिकारी कारवाईची काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here