जिल्हा प्रशासनाने ग्रा प लाखोंडा येथील प्रलंबित घरकुलांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा – डॉ अशोक ओळंबे…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

अकोला-देश्याचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची सन २०२४ पर्यंत प्रत्येकाला घर संकल्पना असून कोणताही नागरिक घरापासून वंचीत राहणार नाही यासाठी शासनाच्या मध्येमातून विविध योजना राबविल्या जात आहेत त्याचा लाभ नागरिकांना प्रशासनाने मिळवून द्यावा ही अपेक्षा आहे परंतु गट ग्रामपंचायत लाखोंडा अंतर्गत लाखोंडा खुर्द,

लाखोंडा बु,घुसरवाडी तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी घरकुलास पात्र असणाऱ्या नागरिकांच्या घराचे चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण झाले असून याला घरकुल संबंधित अधिकारी व डाटा एन्ट्री करणारे कर्मचारी जबाबदार आहेत असे यावेळी नागरिकांनी सांगितले अश्या बेजबाबदार अधिकारी व संबंधीतावर कार्यवाही करून घरकुलांची आवश्यकता असणाऱ्या नारीकांच्या घराचे स्वप्न तात्काळ पूर्ण करून नागरिकांना न्याय देण्याची मागणी भाजपा नेते डॉ अशोक ओळंबे यांनी विस्तार अधिकारी (बीडीओ)श्री राहुल शेळके यांची भेट घेऊन केली.

घरांचे सर्वेक्षण होउन २ वर्ष्याचे वर कालावधी झाला असून बहुतेक नागरिकांना घरे पाडण्याच्या नोटिसेस सुध्धा प्रशासनाच्या वतीने प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे त्यांनी स्वतः घरे पाडून ठेवली आहेत ,ऊन वारा पाऊस ह्यामुळे त्यांच्या निवाराचा प्रश्न निर्माण झाला आहे बऱ्याच लोकांनी राहण्याची तात्पुरती सोय केली आहे परंतु त्यांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळालेच नाही वरून यादीमधील २६ लोकांची घरकुले नाकारली असल्याचे दिसून येत आहे.

वास्तविक घरकुल नाकारण्याची जी कारणे दिली आहेत ती हास्यास्पदअसून ज्यामध्ये,टू व्हिलर, थ्री व्हिलर गाडी असणे,लँड लाईन फोन असने,२ रुम पेक्षा जास्त रूम असने, बोट द्वारे मत्स्यव्यवसाय करणे,जो व्यवसाय या भागात केला जात नाही.करिता तात्काळ चुकीची दुरुस्ती करून ज्यांची घरकुल पाडण्यात आली असे,जे बिपिल कार्ड धारक आहेत,ज्यांना घरकुलची अत्यंत आवश्यकता आहे.

अश्या नागरिकांसाठी तात्काळ योजनेची अंमलबजावणी करून प्रलंबित असलेली व चुकीच्या त्रुट्या दाखवून नाकारण्यात आलेली घरकुले बांधून द्यावी. टू व्हीलर,थ्री व्हीलर,लँडलाईन फोन असणे,ही सामान्य बाब असून जगण्यासाठी आवश्यक बाबी असून ही अट तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने डॉ अशोक ओळंबे यांनी एक निवेदनाद्वारे केली,

यावेळी गजानन गोलाईत,ज्ञानेश्वर भिसे,विजयकुमार घावट,रमेश राणे,मधुकर जुमळे, दिनकर वावरे,राजेश ओळंबे,कैलास वावरे,मोहन सरतकार, प्रथमेश वावरे,आकाश भिसे,विनायक जुमळे, रमेश बुडूकले,यांचेसह लाखोंडा बु,लाखोंडा खुर्द,घुसरवाडी येथील घरकुलापासून वंचीत असलेल्या नागरिकांची उपस्थितीत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here