भंडारज येथील नीराधार लाभार्थी चार महिन्यांपासून वंचित…

पातुर – निशांत गवई

तहसील अंतर्गत येत असलेल्या भंडारज येथील दिव्यांग निराधार विधवा वृद्ध यांना शासनामार्फत अनेक वर्षें पासून अर्थ साहाय्य म्हणून संजय गांधी योजना अंतर्गत काही वर्षांपूर्वी महीकाठि लाभार्थ्यांना सहाशे रुपये अर्थसाह्य मिळत होते परंतु गेल्या दोन वर्षांपासून या मानधनात वाढ करून शासनाने एक हजार रुपये अर्थसाहाय्य लाभार्थ्यास महिन्यासाठी अनुदान सुरू केले खरे परंतु या लाभार्थ्यांचे अनुदान गत तीन चार महिन्यांपासून रखडले असून लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अनुदानासाठी वृद्ध बँकेमध्ये चकरा मारत असून वृद्धाची धडपळ होत आहे बँकेत चकरा वाढल्या आहेत याबाबत अनेक लाभार्थी पातुर तहसील मध्ये धाव घेऊन अनुदानाचे विचारणा करीत आहेत मात्र त्यांना उपस्थित कर्मचारी लाभार्थी सांगत आहेत या वेळी शासनाने कमी प्रमाणात अनुदान पाठविले बाकीचे येणे बाकी आहे ते येत्या आठ दिवसात येणार आहे काही लाभार्थ्यांचे एक हजार ऐवजी चारशे पाचशे रुपये रुपयेअनुदान आले आहेत.

त्यामुळे भंडारज येथील अनेक लाभार्थी हे एकमेव महिन्याच्या मानधनाच्या भरोशावर आपले जीवन जगत आहेत त्यामुळे तीन चार महिन्यापासून अनुदान मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन पगार तात्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत एवढी मागणी लाभार्थी करीत आहेत दिवाळीचा सण येत्या दहा बारा दिवस येऊन ठेपला असून दिवाळीच्या सणाला अनुदान मिळाले नाही तर दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता आहे.

त्यातच महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे वृद्धाचे अनुदान थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे अनुदानाची रक्कम खात्यात जमा झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी वृद्धाची पातुर बँकेत चकरा मारण्याची गर्दी वाढली आहे वृद्धाच्या चक्रा वाढल्या असून त्यांना खर्चाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे पातुर तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना चे कर्मचारी यांना आमचे प्रतिनिधी यांनी विचारणा केली.

असता येत्या आठ दिवसांत निराधार योजनेचे अनुदान जमा होणार आहे चौकट :गेल्या तीन महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनांच्या अनुदाना पासुन वंचित आहे मि पुर्णपणे दोन्ही पायने अपंग असुन माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह माझ्यावर असुन अद्याप पर्यंत अनुदान मिळाले नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा काढवा या चिंतेत आहे अश्या परिस्थितीत शासनाने दिवाळी च्या पुर्वी अनुदान जमा करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here