कमलापूरातील ‘आदित्य’ नावाच्या हत्तीचा मृत्यू झाल्याने वनविभागात उडाली खळबळ…

फाईल – फोटो


गडचिरोली:- अहेरी तालुक्यात आणि सिरोंचा वनविभागांतर्गत येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील हत्ती कॅम्प येथील चार वर्षाचा आदित्य नावाच्या हत्तीचा वनपरिक्षेत्र अधिकार्याच्या दुर्लक्षितपणा,हलगर्जीपनामुळे मृत्यू झाल्याने वनविभागाचा दुर्लक्षितपना चव्हाटयावर आल्याने खळबळ माजली असून वनकर्मचार्यात कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.

मान्सून चे आगमन योग्यवेळी झाल आणि 10 जूनला जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाल्याने “आदित्य “नावाचा हत्ती मध्यरात्री चिखलात अडकला आणि वन कर्मचार्याना महितीच नव्हती दुसर्या दिवशी महिती कमलापुर गावातील नागरिकांनी दिल्याणतर वनकर्मचारी सकाळी 8:15 वा. हत्तीच्या पिल्लाला चिखलातून बाहेर काढण्यात आले होते.

मात्र,चिखलातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अस्वस्थ झाला. तो खूप थकलेला आणि घाबरलेला होता.वन विभागाने त्याच्यावर स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू केले होते.

मात्र आदित्य नावाचे हत्ती खाणेपिणे सोडून दिल्याने उपचारावर प्रतिसाद देत नसल्याने अखेर आज पहाटे आदित्य नावाच्या हत्तीचा पिल्लूने अखेरचा श्वास घेतला.
वनविभागाने योग्य वेळी लक्ष्य देवून तज्ञ पशुवैदयकीय अधिकाऱ्यांना आणले असते आदित्य आज सर्वा समोर असता.

मात्र दुर्लक्षित पनामुळे मुक़्या अबोल जनावराचा मृत्यु झाल्याने पर्यटक तसेच कमलापुर गावातील शोकमग्न झाले आहेत. सदर प्रकरणातील योग्य चौकशी करावी दोषी अधिकार्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी मागणी जिल्हाभरात जोर धरत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here