आंघोळ करण्यासाठी नदीवर गेलेल्या युवकाचा मृत्यू…

चान्नी परिसरामध्ये घडली दुर्दैवी घटना २४ तासा नंतर सापडला मृतदेह

पातुर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील चान्नी येथील ३२ वर्षीय युवक बुधवार रोजीच्या दुपारी एक वाजता दरम्यान विश्वमित्र नदीवर चांनी येथील युवक आंघोळ करण्यासाठी गेला असता त्याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली,

निलेश उत्तम अस्वार असे मृतकाचे नाव आहे.मृतक निलेश अस्वार, बुधवार रोजी पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच दिवानी येथील तरुणांनी दिवसभर नदीमध्ये शोधाशोध केली, परंतु मृतदेह आढळून आला नाही,

तरुणांनी दुसऱ्या दिवशी गुरुवार रोजीच्या सकाळपासून नदीमध्ये शोधण्याची मोहीम सुरू ठेवली, अखेर, निलेश अस्वार याचा मृतदेह २४ तासानंतर गुरुवार रोजी दुपारी नदीमध्ये अडकलेल्या अवस्थेत सापडला सदर घटनेची माहिती मिळताच पातुरचे नायब तहसीलदार सय्यद ऐहसानोद्दीन ,

पोलीस प्रशासन त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि चान्नीच्या दिवाणी येथील सुरेश बर्डे, देवमन चराटे, शांताराम गाडगे, संगीत घुगे, नामदेवराव गायकवाड, सुपा टाके, एडवोकेट सुरेश पवार, राजू चराटे, किशोर अस्वार,यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला,

पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविण्यात आला असून, चांनी पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.घडलेल्या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here