शासनाकडून घरकुल योजनेतील ‘ड’ यादी तयार करण्यात आली होती…

रामटेक – राजु कापसे

परंतु सदर यादीमधुन घरकुल योजनेकरिता पात्र लाभार्थी यांचे नाव वळण्यात आलेले आहेत. तरी नव्याने रीतसर सर्वे करून पात्र लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात यावे, याकरिता रामटेक विधानसभा प्रमुख मा.उदयसिंग उर्फ गज्जूभाऊ यादव यांचा मार्गदर्शनात पंचायत समिति सदस्य भूषण होलगीरे यांचा नेतृत्वात तहसीलदार श्री. मस्के साहेब व खंड विकास अधिकारी श्री. बमनोटे साहेब पंचायत समिति रामटेक यांना निवेदन देण्यात आले सोबत विजय बुरे,

सरपंच ग्राम पंचायत शिवनी (भो.) नरेंद्र सहारे तालुका अध्यक्ष अनुसूचित जाति विभाग, शरद डडुरे तालुका उपाध्यक्ष कॉँग्रेस कमेटी रामटेक ग्रामीण,गुणवंता मडकवार, प्रफुल पानतावणे, सुशील राहाटे,महेंद्र दिवटे, राजेंद्र सोमनाथ, मोनू ठाकुर,दुलिचन आंबेकर, आशीष गयगये, मंगेश लिल्हारे,प्रल्हाद मसुरके, मोरेश्वर माहुली, शेखर सनतापे, शरद बोरकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here