सात वर्षांपासून फरारी असलेला मोक्यातील गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनी केली अटक…

सांगली – ज्योती मोरे

मोका गुन्ह्यातील सात वर्षापासून फरारी आरोपी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी जिल्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक नेमले असून,

त्या पथकाने मोका गुन्ह्यातील गेल्या सात वर्षांपासून फरारी असलेला आरोपी रवींद्र काकड्या काळे वय 55 राहणार तडवळे तालुका खटाव यास माऊली ते खानापूर रोडवरील बस स्टॉप समोर त्यास अटक करण्यात आली आहे सदरचा आरोपी हा विटा पोलीस ठाणे कडील मोक्याच्या गुन्ह्यात गेल्या सात वर्षापासून फरार होता.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार ,पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे ,सहाय्यक पोलीस फौजदार अच्युत सूर्यवंशी , सिद्धाप्पा रुपनर ,राजाराम मुळे , संदीप पाटील, सचिन कनप , स्नेहल शिंदे यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here