मूर्तिजापूर | स्टेशन विभागातील मारहाण प्रकरणात सर्व आरोपींना न्यायालयाने दिला जामीन…

दिनांक 20. 4. 2021 रोजी सिद्धार्थनगर येथील श्री. धुरदेव यांनी पोलीस स्टेशन मुर्तीजापुर येथे आरोपी 1) अक्षय उर्फ सोनू मिलिंद पंडागळे २) विजय लक्ष्मण बोराडे ३) नरसिंग इतवारी चावरे ४) सागर नर्सिंग चावरे ५) गगन चावरे व ६) दादू घोरे यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशन मुर्तीजापुर येथे तक्रार दिली की दिनांक 20. 4. 2021 रोजी तक्रारदार त्यांचे राहते घरी त्यांचे पत्नी दोन मुले व त्यांच्या आत्याची मुलगी यांचेसह जेवण करून घरी झोपलेले होते त्यावेळेस रात्री अंदाजे 12/१० वाजता चे सुमारास त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा जोराने वाजू लागला म्हणून ते व त्यांची पत्नी दरवाज्याजवळ गेली तर त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घराच्या आत मध्ये सिद्धार्थ नगर मधील वरील आरोपी हे आले.

त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये स्टंप व बल्ली होती आरोपींनी ते बल्ली तक्रारदाराचे कपाळावर मारली त्यामुळे ते खाली पडले तसेच लाकडी स्टंप त्यांच्या आतेबहीनी च्या हातावर मारले तसेच थापडांनी मारून तिला ओढतान केले त्याच वेळेस दुसऱ्या आरोपीने तक्रारदाराच्या पत्नीच्या हातावर लाकडी काठी मारली व इतर आरोपी हे तक्रारदाराच्या खिडक्या वर दगड मारून खिडकीचे काच फोडत होते तसेच आरोपींनी तक्रारदाराच्या घराच्या पाठीमागचा दरवाजा तोडून घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड केली.

त्याच प्रमाणे आरोपींनी अक्षय होटे नामक युवकाच्या घराचे दार तोडून आरोपी त्यांच्या घरात घुसले व आरोपि यांनी त्यांचे आईचे डावे गालावर धारदार चाकूने मारले त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील खिडक्यांची व सामानाची तोडफोड केली अशा प्रकारचा रिपोर्ट तक्रारदाराने आरोपींविरोधात दिल्याने आरोपीं विरोधात शहर पोलीस स्टेशन मुर्तीजापुर येथे भारतीय दंड विधान चे कलम १४४, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ४२७ तसेच ४५२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. व न्यायालयलया समक्ष हजर केले.

वरील सर्व आरोपी यांनी त्यांच्या अटकेला व त्यांच्या विरुद्ध दाखल केलेले गुन्हे यांना आव्हान देण्याकरिता त्यांनी त्यांचे वकील ॲड. सचिन चंद्रमणी वानखडे यांच्यामार्फत मूर्तिजापूर येथील फौजदारी न्यायालया समक्ष जामीन अर्ज दाखल केला. सदर जामीन अर्जास सरकारी वकिलांनी व मूर्तिजापूर येथील पोलिसांनी प्रखर विरोध करीत न्यायालयात सांगितले की सदरचा गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून अजामीनपात्र आहे तसेच सदर गुन्ह्यांमध्ये सात वर्षे पर्यंतच्या शिक्षेचे प्रावधान आहे, आरोपींना जर जामिनावर सोडले तर ते साक्षीदारांना धमकावू शकतात व फरार सुद्धा होऊ शकतात व अशाच प्रकारे गुन्हे सुध्दा पुन्हा करू शकतात त्याच प्रमाणे तेथे दहशत पसरवू शकतात करिता आरोपींचा जामीन खारीज करणे बाबत न्यायालयास विनंती केली.

त्याच प्रमाणे आरोपीचे वकील ॲड. सचिन वानखडे यांनी न्यायालयात सांगितले की आरोपींना सदर प्रकरणात खोटे फसवण्यात आले असून आरोपीविरुद्ध सदरचे गुन्हे प्रथम दर्शनी सिद्ध होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी न्यायालयात सांगितले की सदरच्या गुन्ह्यांमध्ये मृत्युदंड अथवा जन्मठेपेच्या शिक्षेचे प्रावधान नसल्याने आरोपी त्यांना जामिनावर सोडण्यात यावे आरोपींना जेलमध्ये पाठविल्यास कोणताही हेतू सिद्ध होणार नाही याकडे सुद्धा त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले त्याकरिता आरोपीचे वकील यांनी न्यायालयाचे इतरही काही महत्त्वाच्या बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधून सदर गुन्ह्या संबंधात काही महत्त्वाच्या बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या व सर्व आरोपींचा सशर्त जामीन मंजुर होनेस विनंती केली

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकुन सर्व आरोपी नामे 1) अक्षय उर्फ सोनू मिलिंद पंडागळे, २) विजय लक्ष्मण बोराडे, ३) नरसिंग इतवारी चावरे, ४) सागर नरसिंग चावरे, ५) गगन चावरे व ६) दादू घोरे यांना सशर्थ जामीन मंजूर केला.

वरील सर्व आरोपींच्या वतीने न्यायालयात ॲड. सचिन वानखडे यांनी युक्तिवाद केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here