देशातील पहिले सॅनिटरी नॅपकिन मुक्त गाव…

न्युज डेस्क – साक्षरतेसह अनेक बाबतीत केरळ देशात आघाडीवर आहे. राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यात आता नवीन सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील कुंबळंगी गाव हे देशातील पहिले सॅनिटरी नॅपकिनमुक्त गाव ठरणार आहे.

गावातील 18 वर्षांवरील महिलांना 5000 विशेष मासिक कप वाटप करण्यात आले आहेत. ते मासिक पाळीच्या दरम्यान वापरले जाऊ शकतात. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी ही मोहीम सुरू केली. याअंतर्गत 18 वर्षे व त्यावरील महिलांना 5000 मासिक पाळीचे कप वाटण्यात येणार आहेत.

एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघात हा प्रकल्प राबवला जात असल्याची माहिती खासदार हिबी एडन यांनी दिली. यासोबतच राज्यपालांनी या गावाला आदर्श गाव म्हणून घोषित केले. आदर्श ग्राम प्रकल्प पंतप्रधान संसदीय मतदारसंघ आदर्श ग्राम योजना (SAGY) द्वारे राबविण्यात येत आहे.

कोचीमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या कुंबलांगी गावात एक नवीन पर्यटन माहिती केंद्र देखील सुरू केले जाईल. हे गाव देशातील पहिले आदर्श पर्यटन गाव म्हणूनही ओळखले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here