शेलुबाजार – पवन राठी
शेलुबाजार येथून जवळ असलेल्या व वाशिम व अकोला जिल्हाच्या मध्यभागी निसर्गाने निर्माण केलेले अदभुत नैसर्गिक देन म्हणजे काटेपुर्णा अभयारण्य तसेच अकोल्याला व परिसरला पाणी देणारे जंगल अशी ओळख असणाऱ्या काटेपुर्णा अभयारण्याचा स्थापना दिवस एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने केक कापुन साजरा करण्यात आला.
८ फेब्रुवारी १९८८ रोजी काटेपुर्णा अभयारण्याची स्थापना करण्यात आली होती. आज ३३ वर्ष पुर्ण झालेत त्यानिमित्ताने दि.८ रोजी लगतच्या गावातील शालेय विद्यार्थ्यांना काटेपुर्णा अभयारण्यात निसर्ग सहलीला आणण्यात आले होते. त्यांना नव्याने नियुक्त झालेल्या गाईडनेे सहली दरम्यान काटेपुर्णातील जैवविवधेतेचे माहीती दिली व बोटीची सैर घडवून आणली.
तसेच काटेपुर्णा अभयारण्यात अकोला व वाशिम येथील विज्ञान महाविद्यालयातील प्राणीशास्त्र वनस्पती शास्त्र व सुक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यपकांचा अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यास दौऱ्यात श्री.शिवाजी महाविद्यालय , शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय, आर.एल.टी. सायन्स कॉलेज,अकोला. गुलामनभी आजाद महाविद्याल, बार्शिटाकळी, महात्मा फुले महाविद्यालय,
पातुर येथील 20 प्राध्यापक व प्राध्यापिका सहभागी झाल्या होत्या. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे उपजिविका तज्ञ श्री. प्रफुल्ल सावरकर यांनी मेळघाटातील विविध उपक्रमाची माहीती दिली तर निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी काटेपुर्णा अभयारण्याची माहीती व डॉ. मिलिंद शिरभाते यांनी अभयारण्यातील संशोधनाच्या विविध संधी याबद्दल स्लाईड शोद्वारे माहीती दिली. सर्व प्राध्यापकांना काटेपुर्णातील सफारी घडवून आणण्यात आली.

अकोला वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्व प्राध्यापकांना त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना काटेपुर्णातील जैवविविधतेचा अभ्यास करून घेण्यासाठी व त्यावर संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे , तसेच जैवविविधतेच्या संरक्षण व संवर्धनासाठी आपण पण संशोधन करून सहकार्य करावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन वन परिश्रेत्र अधिकारी भानुदास पवार यांनी केले. शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. हेमंत सपकाळ, तुषार देशमुख, डॉ उज्वला लांडे, डॉ शुभांगी गावंडे, डॉ अनुराधा राजोरीया, महात्मा फुले महाविद्यालय पातूर येथील डॉ.अमृता शिरभाते, प्रा. रोशनी लोमटे, रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालया चे डॉ.सुशील नगराळे, डॉ.सुधीर कोहचाडे, डॉ.हरिष मालपाणी,
डॉ शैलेंद्र मडावी, शंकारलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या डॉ.प्रिया धाबे, डॉ. निशा वराडे, जी.एन.ए.महाविद्यालय बार्शीटाकळी येथील डॉ.संतोष सुरडकर, डॉ.विनोद उंडाळ, पुंडलीकरव गवळी महाविद्यालयाचे डॉ.सीमित रोकडे, वतसगुल्म जैवविविधता संस्थेचे पुरुषोत्तम इंगळे,पत्रकार पवन राठी, सचिन राणे व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.