आयग्रीड सणासुदीच्या हंगामात अनेक नवी उत्पादने लॉन्च करण्यासाठी कंपनी सज्ज…

मुंबई – भारताचा अग्रगण्य ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि लाइफस्टाइल ब्रँड आयग्रीड (iGRiD) यंदाच्या सणासुदीच्या हंगामात अनेक नवी उत्पादने लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. ब्रँडला आधीच वाढत्या मागणी व पुरवठ्यासोबतच जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

ब्रँडच्या उत्पादन मालिकेत नव्या वस्तू जोडल्या जात असल्यामुळे रोजगारातही वाढ होणार आहे. नव्या हंगामातील युनिसेक्स कलेक्शनचा समावेश असलेली उत्पादनांची नवी श्रेणीही लॉन्चिंगसाठी सज्ज झाली आहे. तसेच संस्थात्मक गरजांमुळे कंपनीने चालू वित्तवर्षात १००+ व्यावसायिकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी आयग्रीडने २०+ कर्मचाऱ्यांच्या कार्यबलानिशी काम केलेले आहे. मात्र, अलीकडेच कंपनीने सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट कर्मचारी भरती करून आपली क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आयग्रीडच्या नवीनतम उत्पादन मालिकेत चेहरा व केश या दोन्ही श्रेणींच्या उत्पादनांचा समावेश असणार आहे.

त्यात आयन मसाजर, फेशिअल फाइन हेअर ट्रिमर्स, फेशिअल आयोनिक सौना, डीप कोअर डिव्हाइसेस हेअर : ड्रायर, कर्लर्स, हेअर स्ट्रेटनिंग ब्रेशेज, कॅलस रिमूव्हर्स आणि सेमी प्रीमियम रेंजमधील अनेक उत्पादने समाविष्ट आहेत.

आयग्रीडचे संस्थापक आणि संचालक श्री. माधव कोटा म्हणाले की, “ग्राहकांकडून मिळणारा भरीव प्रतिसाद आणि बाजारपेठेतील जोरदार मागणीमुळे आम्ही हेअर तसेच फेस श्रेणीत १५ नवीन उत्पादने लॉन्च करत आहोत. आमच्या नवकल्पनांच्या माध्यमातून आम्ही सेमी प्रीमियम श्रेणीत पाऊल टाकण्यासाठी सज्ज झालो आहोत. आमची नवीनतम उत्पादने ही अतिशय वाजवी दरांत असतीलच. तसेच ती दर्जेदार असतील, याचीही खात्री मिळेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here