Saturday, June 15, 2024
spot_img
Homeराज्यकसारा स्थानकापुढे मालगाडी चे डब्बे घसरले…कसाऱ्या हुन डाऊन नाशिक दिशेला जाणारी रेल्वे...

कसारा स्थानकापुढे मालगाडी चे डब्बे घसरले…कसाऱ्या हुन डाऊन नाशिक दिशेला जाणारी रेल्वे सेवा प्रभावित…

रेल्वे प्रवाशी संघटनेचे रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप…..

कसारा( शहापूर) – प्रफुल्ल शेवाळे

मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गानंतर कसारा ते TGR-3 डाउन लाईन सेक्शन दरम्यान आज संध्याकाळी 7 च्या सुमारास डाउन मेन लाईनवर मालगाडी रुळावरून घसरली आहे. मालगाडी- JNPT/DLIB कंटेनर ट्रेन. 3 वॅगन रुळावरून घसरल्या.

आज संध्याकाळी साधारण 7च्या सुमारास कसारा ते इगतपुरी सेक्शन डाऊन सेक्शनमध्ये मेल एक्स्प्रेसची वाहतूक प्रभावित झाली आहे.
उपनगरीय लोकल ट्रेन वाहतुकीवर परिणाम झालेला नाही.
इगतपुरी ते कसारा अप विभागातील वाहतूक प्रभावित नाही, ती सुरू आहे.

कल्याण स्टेशन रोड एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन आणि इगतपुरी स्टेशन रेल्वे एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) ऑर्डर केली आणि अपघात स्थळी हलवली आहे.. सदर चे मालगाडी चे तीन डब्बे डाऊन दिशेला कसारा स्थानकाच्या पुढे काही अंतरावर जाऊन घसरले आहे.

घटना स्थळी रेल्वे चे अधिकारी आणि दुरुस्ती पथक पोहचले असून डाऊन नाशिक च्या दिशेची रेल्वे वाहतूक सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न रेल्वे प्रशासना कडून करण्यात येत आहेत.. सदर घटनेची माहिती कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन अध्यक्ष शैलेश राऊत यांनी दिली आहे..

तर रेल्वे मालगाडी डब्बे घसरणे असे प्रकार मालगाडी डब्ब्यांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त भार टाकणे आणि कसारा पुढे रेल्वे मार्गवार देखभाल दुरुस्ती अभाव यामुळे अशा घटना घडताना पहायला मिळतात असा गंभीर आरोप कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजेश घनघाव यांनी केला आहे..

Prafulla Shewale
Prafulla Shewalehttp://mahavoicenews.com
मी, प्रफुल्ल शांताराम शेवाळे, रा. टिटवाळा ता. कल्याण जि. ठाणे, पदवी - विद्युत अभियंता, विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात 20 वर्षे अनुभव. पत्रकारिता गेल्या 7 वर्षापासून करतो, मी महाव्हाईस न्यूज ला गेल्या पाच वर्षापासून परिसरातील बातम्या देण्यासाठी नेहमीच सहकार्य करतो...
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: