औरंगाबाद शहरात लाॅकडाऊन ची नुसती अफवा… शहर पुन्हा लाॅकडाऊन होनार नाही – अंबादास दानवे…

औरंगाबाद – विजय हिवराळे

औरंगाबाद शहरात सगळीकडे लॉकडाऊन होणार असल्याची अफवा जोर धरत आहे त्यामुळे आज झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीनंतर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले आहे की, शहरात यापुढे कुठल्याही प्रकारचे लॉकडाऊन होणार नाही.

आपण आता अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत आहे. अगोदरच सगळेजण लॉकडाऊनने परेशान झालेले असताना आता कुठलेही लॉकडाउन होणार नाही. फक्त शासनाने दिलेल्या निर्बंधांचे सर्वानी पालन करावे. मास्क लावणे, सेनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे या गोष्टी करीत राहा. आणि काळजी घ्या असे आवाहन त्यांनी यावेळी जनतेला केले. त्यामुळे सध्या तरी शहरात लॉकडाऊन होणार नाही. आणि अश्या स्वरूपाच्या अफवाना नागरिकांनी बळी पडू नये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here