उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नक्कीच कठोर निर्णय घेतील – आम.गोपिचंद पडळकर…

सांगली – ज्योती मोरे.

लखीमपुरच्या शेतकऱ्यांबद्दल आम्हाला संपूर्ण सहानूभूती आणि सहवेदना आहे. म्हणूनच याचा सर्व तपास सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे.आणि आमचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी ते क्षमतापूर्ण आहेत, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ते नक्कीच कठोर निर्णयही घेतील. अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे.

पण जनाब राऊत तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांबद्दल बोला. तो ओल्या दुष्काळामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर आला आहे.शेतकऱ्याचा साताबारा कोरा करू म्हणणारे अजूनपर्यंत त्याला मदत द्यायला बांधावरती पोहचले नाही.अजूनही शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या खाबूगिरीतच अडकवलेलं आहे. तुमचा हा महाराष्ट्र बंदचा कांगावा म्हणजे आपल्या घरात आग लागलेली असताना शेजारच्या गावातील धुरावर बोंबा मारण्यासारखे आहे.असा जोरदार टोलाही आम.पडळपर यांनी लगावलाय.

मुळात तुम्हाला काकाचं दु:ख सतावत आहे. कारण मा. पंतप्रधान मोदीजी महाराष्ट्राच्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची किड साफ करतायेत. आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे खाणारे कारखाने कवडी मोल भावाने गिळणाऱ्यावरती फास आवळत आहेत. याचंच पित्त झाल्यामुळे हा महाराष्ट्र बंदचा देखावा असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here