न्यूज डेस्क – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात सुरु असलेल्या कोरोनाच्या पार्श्भूमीवर जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनातून कोरोनाबाबत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत, याचीही माहिती दिली.
‘कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. दुसरी लाट आली आहे की नाही हे 10-15 दिवसांत कळेल. पाश्चिमात्य देशांत कोरोना रुग्ण वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. लॉकडाऊन हे कोरोनावरील उत्तर असेल नसेल पण साखळी तोडण्यासाठीचा तो एक पर्याय नक्कीच आहे.
आपल्यालाही सर्वांना आता बंधन पाळावंच लागेल. आपण गाफील राहिलो तर आपल्याला पुन्हा कडक लॉकडाऊन करावा लागेल,’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी आगामी काळात राज्यात निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत.
‘लसीकरणाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. त्यामुळे ज्या कोरोना वॉरियर्सने अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी ती घ्यावी,’ असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.