वनमंत्री संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनामुळे मुख्यमंत्री संतापले…तत्काळ कारवाईचे मुख्यमंत्र्याचे आदेश

न्यूज डेस्क – राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे आज मंगळवार वाशीम मधील पोहरादेवी येथे सर्वांसमोर आले होते, यावेळी पोहरादेवी येथे झालेल्या शक्तीप्रदर्शनामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दाखल घेत कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी भाजपाने आरोप केलेले व जवळपास १५ दिवस अज्ञात राहिलेले संजय राठोड हे पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी आल्यावर झालेल्या मोठ्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाला त्यांच्यात मंत्र्याकडून एकप्रकारे हरताळ फासला गेल्याचे दिसून आले. याबाबत माध्यमांनी सरकारला जाब विचारणं सुरू करताच, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत कठोर कारवाईचे आदेश दिले.

वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here