अकोल्यात वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ…

अकोला शहरातील बळवंत कॉलनी परिसरात आज पहाटेच्या सुमारास वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आलेय. नथूराम भगत आणि हेमलता भगत असं या वृद्ध दांपत्याचं नाव आहेय.

नथ्थूराम भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आहेय. मृतक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास झालेले असल्यामूळे हा चोरी आणि खुनाचा प्रकार असल्याचा आरोप भगत कुटूंबियांनी केलीय.

अकोल्यातील बळवंत कॉलनी परिसर दांपत्यांच्या म्रूत्यूनं हादरून गेलाय. नथ्थूलाल भगत आणि हेमलता भगत हे दांपत्य आज सकाळी घरात जळालेल्या अवस्थेत मृत आढळून आलेय.

भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी आहेय. त्यांचा एक मुलगा बैंगलोर येथे राहतोय. तर एक मुलगी सोलापूर तर दुसरी अकोल्यात राहतेय. सकाळी घरातून धूर निघत असल्याने घरातील भाडेकरूंनी आरडाओरड केलीय. दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता दांपत्य मृतावस्थेत आढळून आलेय.

Also Read: Breaking | यवतमाळ ४२ पैकी ४१ रिपोर्ट निगेटिव्ह…एकाचे निदान नाही…

ही घटना कशामुळे घडली आणि यामागे काय कारण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत. नथूराम भगत आणि हेमलता यांच्या बंगल्यात त्यांच्या पत्नीसह दुसरे कोणीही कुटुंबीय राहत नव्हतेय.

घरात आग लागून जीव गुदल्यामुळे मृत्यू झाला झाला की ही खून किंवा आत्महत्या आहेय, याचा शोध पोलीसांना घ्यावा लागणारेय. दरम्यान,मृतक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास झालेले असल्यामूळे हा चोरी आणि खुनाचा प्रकार असल्याचा आरोप भगत कुटूंबियांनी केलीय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here