अकोला | अनोळखी युवतीचा जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला…परिसरात खळबळ…घातपाताची शक्यता…

बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड शेतशिवारात एका 25 वर्षिय अनोळखी युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आज रोजी सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, सदर युवतीची जाळुन हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे….बोरगाव मंजू पोलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड शेतशिवारात वाधोळकर यांचे शेत आहे,ते आज सकाळी आपल्या शेतात कुटार आणण्यासाठी गेले असता त्यांना सदर युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, दरम्यान सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना दिली.

तर घटना स्थळावर मुर्तीजापुर पोलिस उपविभागीय अधिकारी, ठाणेदार , गुन्हे अन्वेषण विभाग पोलिस निरीक्षक, ठसे तज्ज्ञ,सह बोरगाव मंजू पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर अर्धवट जळालेला मृतदेहासह घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला,

दरम्यान सदर युवतीची अदयापपर्यंत ओळख पटली नसल्याची माहिती आहे, दरम्यान सदर मृतक अनोळखी युवती कोण, नेमका घातपात की काय, घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत असुन तो हत्यारा कोण या दृष्टिकोनातून पोलिस अधिक तपास करत आहेत.

आताच आलेल्या माहिती नुसार सदर युवतीचे ओळख पटली असून समीक्षा श्रीकृष्ण देवर वय वर्ष 25 असे युवतीचे नाव असून ती मालोकार निम्बी येथील रहिवाशी आहे. तर सध्या ती अकोल्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here