The Burning Train | दुर्ग-उधमपूर एक्सप्रेसच्या ४ बोगीला आग…पाहा व्हिडीओ

फोटो - video स्क्रीन शॉट

न्यूज डेस्क – दिल्लीहून छत्तीसगडला जाणाऱ्या दुर्ग एक्स्प्रेसच्या चार बोगींना आग लागली. आगीमुळे अचानक धुराचे लोट चार बोगीत भरले. मध्य प्रदेशातील मुरैना येथील हेतमपूर रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवण्यात आली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल आहे. आगीचे कारण अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन 20848 दुर्ग-उधमपूर एक्सप्रेसच्या A1 व A2 मध्ये आग लागली आहे. ही ट्रेन दिल्लीहून दुर्गला जात होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. सर्व प्रवासी वेळेत ट्रेनमधून बाहेर पडले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ट्रेनला आगीचे कारण समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here