बहिणीने प्रेमविवाह केल्याचा मनात राग धरून भावाने हे कृत्य केले…

न्यूज डेस्क –  बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून भावाने बहिणीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सदर घटना कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात एक भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार समोर आलाय. बहिणीने घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीवर प्राणघातक हल्ला केला. चक्क खुरप्यानं बहिणीचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केलाय. सुदैवानं या हल्ल्यात बहिण थोडक्यात बचावली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या गुढे गावात ही घटना घडली आहे. गुढे गावात एका मुलीनं घरच्यांच्या मनाविरूद्ध प्रेमविवाह केला. या विवाहाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे संतापलेल्या भावानं आपल्या बहिणीवर प्राणघातक हल्ला करत खुरप्यानं तिचं मुंडकं उडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र, ती या हल्ल्यात बालंबाल बचावली. खुरप्याने वार केल्यानं बहिणीच्या पाठीवर आणि मानेवर जखमा झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here