झिमेला गावाला जोड़नारा पुल गेला वाहुन…आवागमन करण्यास नागरिकांना होतोय कमालीचा त्रास…

गडचिरोली – मिलींद खोंड

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत तिमरम अंतर्गत येणारया झिमेला गावाला जोडणारा एकमेव मुख्य रस्ता आहे.झिमेला नाल्यावरील पुलाचे बांधकाम होऊन 35-40 वर्षांचा काळ लोटलाआहे. हा पुल उंचीने ठेंगना असून पूर्णपणे जीर्णावस्थेत आहे.

गेल्या 15 दिवस सतत मुसळधार पावसामुळे या नाल्यावरील पुल पूर्णपणे वाहून गेला आहे.झिमेलावासीयांना काही कामानिमित्त तालुका किंवा अन्य ठिकाणी जाणे-येणे करण्यास अडचणीचे जात आहे.त्यामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

मुख्य मार्गावरील पुल वाहून गेल्यामुळे आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी मोठ्या अडचणीना तोंड द्यावे लागते आहे.या झिमेला गावातील नागरिक, विध्यार्थी, शेतकरी, आरोग्य कर्मचारी,रुग्ण यांना होणाऱ्या अडचणींचा विचार करून शासनाने या नाल्यावर नवीन पुल बांधकाम करून पुलाची ऊंची वाढवावी.

तात्काळ संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन पुल दुरुस्ती करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष गणपूरवार ,सुरेश पोरतेट, तिरुपती सडमेक, विनोद तोर्रेम, भगवान सिडाम, धर्मराज पोरतेट, अशोक आत्राम,बापु सिडाम, शंकर गावडे, दिलीप आत्राम यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here