पोलीस स्थानकाच्या हद्दीच्या कारणांची हद्द झाली..! अन तीन पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार बाद झाली..!

नांदेड – महेंद्र गायकवाड

दागिने चोरीची तक्रार दाखल करण्यास गेलेल्या फिर्यादीलाच नांदेड ग्रामीण पोलिसांनी हाकलून लावले.  त्या पाठोपाठ कुटूंर व वजिराबाद पोलिस ठाण्यातही फिर्यादीला तोच अनुभव आला  अखेर परभणी जिल्हयातील मानवत येथील विलास उध्दवराव पाटील यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेदन देवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पोलीस स्थानकाच्या हद्दीच्या कारणांची हद्द झाली.

अन तीन पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार बाद झाली ही चर्चा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. परभणी जिल्हयातील मानवत येथील विलास उध्दवराव पाटील हे मुलीला माहरी घेवून जाण्यासाठी कोलंबी ता.नायगाव खौ. येथे गेलो होते.मुलीला घेवून मानवतला परत जात असतांना बस प्रवासासत कहाळा-नांदेड प्रवासात 2 तेळै सोन्याचे दागिने चोरीला गेले.  सोन्याचे झुंबड जोड, मनीगंठन, 80 मनी पेंडाल, 3 लहान ओम, काडी 2, कंबरसाखळी, नाकातील नथ, आणि टायटन घडी एवढा ऐवज होता.  

सदर घटना 19 नोव्हेंबर बुधवारी दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घडली. सदर घटना नांदेड बसस्थानकावर आल्यावर समजली.  संशयीत व्यक्ती एमआयडीसी येथील चंदासिग कॉर्नर येथे उतरला होता.  त्यामुळे तक्रार दाखल करण्यासाठी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात गेलो.  

तेथे गेल्यानंतर तक्रार घेण्यास पोलिसांनी नकार दिला.  तुम्ही जेथून बसलात त्याच हद्दीत पोलिस स्टेशनमध्ये जावून तक्रार करण्याचा सल्ला दिला.  त्यानंतर मी कुटूंर पोलिस ठाण्यात गेलो तेथे गेल्यानंतर तेथील पोलिसांनी जिथे तुम्हाला घटना माहिती झाली. तिथल्या जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करा.  असे सांगून वजिराबादा पोलिस ठाण्यास जाणयस सांगितले.

दागिने चोरीस गेल्याच्या घटनेची तक्रार नोंदवून आरोपीला अटक करण्यात यावे. अशी मागणी विलास पाटील यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे निवेनाद्वारे केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयित व्यक्ती आढळून आल्याची माहिती दिली.  एकाही पोलिसांनी माझे म्हणणे ऐकून घेतले नाही.  कार्यवाही तर दुरच राहिली. अशी खंत त्यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here