म्हैसांग येथील पुलावरून पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या ३३ वर्षीय युवकाचा मृतदेह सापडला…

न्यूज डेस्क – दिनांक 27 जुलै रोजी म्हैसांग येथील पुलावरून पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचा मृतदेह आज वळद नजीक पुर्णा पात्रात सापडला असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, व संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.

सुरेश नारायण बचे असे त्या युवकाचे नाव असून तो रा.उमरी ता.दर्यापुर ह.मु.बाळापुर नाका अकोला येथील रहिवाशी आहे. त्याचे वय (33) या युवकाने 27 जुलै रोजी म्हैसांग येथील पुलावरून पुर्ण नदीपात्रात आत्महत्या केली होती आज सर्च ऑपरेशन दरम्यान वळद नजिक सुरेशचा मृतदेह आढळून आला आहे.

आजच्या सर्च ऑपरेशन मध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनात तलाठी श्री.सुनील कल्ले, तलाठी श्री.हरीहर निमकंडे आणी सहकारी तसेच मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे नितीन कोलटके,पंकज श्रीनाथ, तुळशिदास फुकट,हे सहभागी होते, यावेळी बोरगाव पो.स्टामे.चे ठाणेदार सोळंके साहेब, हे.काॅ.गोपणाराण साहेब विषेशतः लक्ष ठेवून होते, आणी नातेवाईक हजर होते.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी फोनवरुन दीली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here