मूर्तिजापूर कंझारा टी पॉईंट जवळ ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ…घातपात की आत्महत्या?

नरेंद्र खवले

मूर्तिजापूर कंझारा टी पॉईंट जवळ ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ, घातपात की आत्महत्या? शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तर इसमाचा मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य शवगृहात आणण्यात आला आहे.

मूर्तिजापूर कंझारा टी पॉईंट जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या कडेला आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान एका 55 वर्षीय व्यक्तीची मृतदेह आढळून आला.

सदर इसम हा हॅन्डज येथील येथील सतनाम सिंग यांच्या धाब्यावर काम करीत असल्याची ओळख पटली असून अशोक मिलके 55 असे मृतक इसमाचे नाव आहे. तो अमरावती जिल्ह्यातील शदातपुर वळगाव जवळ चा रहिवाशी असल्याची माहिती सतनाम सिंग यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

16/11/2020 ला 1500/- रुपये मजुरी घेऊन अमरावती बहिणीला भेटला जातो असे सांगून मृतक अशोक मिलके हा अमरावती गेला होता परंतु आज सकाळी दहा वाजता कंझरा टी पॉईंटवर त्यांची संशयास्पद रूपात लाश आढळून आली. याची माहिती मिळताच मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहचले व वंदे मातरम आपत्कालीन पथकाला प्राचार्यांकडून मृत व्यक्तीला लक्ष्मीबाई देशमुख उप जिल्हा रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. हा घातपात की आत्महत्या याचा शोध मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here