शहरात परगावातून आलेल्या ‘काळ्या डुकरां’चा सुळसुळाट पातूर नगर परिषद क्षेत्रात करुन ठेवली घाण; नागरिकांसाठी ठरताहेत डोकेदुखी…

पातुर. गेल्या अनेक वर्षांपासून पातूर शहरात बाहेर ठिकाणाहून आलेल्या काही ‘काळ्या डुकरांनी’ शहरात अनेक ठिकाणी घाण करून ठेवल्याने शहराचा पूर्णत: बट्ट्याबोळ करून ठेवला आहे.

ही ‘काळी डुकरे’ ज्या ठिकाणी रिकामी जागा दिसेल तिथे ताबा करतात, मग तो कुठल्याही मार्गाने असो! याबाबत काही सुज्ञ नागरिकांनी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांच्यावरच गुर्रावत असल्याचा प्रत्यय नागरिकांना येत आहे.

या डुकरांनी करून ठेवलेली घाण नगर पालिका प्रशासनाने साफ करावी, असे सामान्य नागरिकांच्या मनात आहे, परंतु या डुकरांनी वावर चक्क नगर परिषदेमध्येही असल्याने नगर परिषद प्रशासन यांच्यावर का कारवाई करत नाही? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

या डुकरांचा वावर असलेले बरेचसे क्षेत्र आता शिर्ला ग्रामपंचायतमध्ये गेल्याने या डुकरांनी नगर परिषद क्षेत्राव्यतिरिक्त शिर्ला ग्रामपंचायतमध्येही घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील सुज्ञ नागरिकांनी त्यांना चांगलेच लाथाडले.

पातूर नगर परिषद हद्दीमध्ये बर्‍याच ठिकाणी मोकळ्या जागा, रिकामी घरे आदी ठिकाणांवर या डुकरांनी कब्जा केला आहे. या डुकरांनी करून ठेवलेल्या घाणीमुळे शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तरी या काळ्या डुकरांचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास त्याचे गंभीर परिणाम नागरिकांसह नगर पलिका प्रशासनाला भोगावे लागतील, या डुकरांच्या घाणीमुळे जर काही उपद्व्याप झाला तर याला जबाबदार असणार्‍या नगर पालिका प्रशासनाला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

जर या काळ्या डुकरांचा ताबडतोब बंदोबस्त केला गेला नाही तर ते संपूर्ण शहरातील खाली जागा आपल्या ताब्यात घेऊ पाहत आहेत, परंतु आता नागरिक यापासून सावध झाल्याने या डुकरांना लवकर शहराबाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहेत. आता या डुकरांच्या त्रासाला आणखी कोण बळी पडणार? की या डुकरांचा बंदोबस्त लागणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here