मंत्री शशिकला जोल्ले यांच्या वाढदिनी अपंगांना दुचाकी आणि पेंशन प्रमाणपत्र वितरण…

राहुल मेस्त्री

कर्नाटक राज्य महिला व बालविकास मंत्री नामदार सौ.शशिकला जोल्ले यांच्या 51 व्या वाढदिवसा निमित्त कोगनोळी ता.निपाणी येथील अपंगत्व असणाऱ्या तीन लाभार्थ्यांना दुचाकी गाडीचे वाटप केले. आणि वयोवृद्ध, विधावा व इतर पेंशन लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आज दि.20 नोव्हेंबर रोजी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्री शशिकला जोल्ले यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून आनंद व्यक्त केला.यावेळी नितीन परीट,कुमार आबणे,लता चंद्रकांत पाटील यांना दुचाकी वितरण करण्यात आले.

त्याचबरोबर शोभा तानाजी माने, ज्योती दादासो घोसरवाडे, केरबा नवाळे, आनंता बर्गे ,आनंदा पंढरे, सुशीला भाऊसो पाटील ,संगीता दत्तात्रय पाटील, आप्पासाहेब तुकाराम पाटील ,सुनिता अशोक रेडकर, बिरू कोळेकर, कमल सदाशिव पुणेकर या पेन्शन लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण केले.

याप्रसंगी कुमार पाटील, विलास नाईक सर ,सुनील माने, कुमार व्हटकर, नामदेव यादव, नितीन धनवडे, दिलावर भैरवाडे, वैभव पाटील, अमित गायकवाड ,अरुण पाटील, कमल पाटील, प्रीतम शिंत्रे ,मारुती पुणेकर, सचिन निकम, प्रकाश पवार, सी के पाटील, रावसाहेब खोत, बाळासो माने यांच्यासह कोगनोळी येथील अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here