पार्किंगमधील उभी असलेली बाईक अचानक चालू लागली…काय सत्यता आहे ते जाणून घ्या…

न्यूज डेस्क – सध्या सोशल मिडीयावर एक Video झपाट्याने व्हायरल होत आहे. तो म्हणजे चालकाशिवायच बाईक सुरु होऊन चालत असल्याचा, ज्यामध्ये तुम्हाला असं दृश्यं दिसणार आहे, जे तुम्हाला एखाद्या हॉरर फिल्ममधील वाटेल पण ते रिअल आहे. हा Video अंबर झैदी यांनी आपल्या Twitter वर शेयर केला आहे.

सोशल मीडियावर बाईकचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही शॉक व्हाल. तुमच्या अंगावरच काटा येईल. हा शॉकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

बाईक सुरु करायची असेल तिला किक मारावी लागते किंवा strat बटन दाबावे लागते हे करायला एखादा माणूस तर लागतो. पण या व्हिडीओत दिसणारी बाईक माणसाशिवायच आपोआप सुरू झाली व्हिडीओत पाहू शकता, रस्त्यावर पार्किंगमध्ये काही बाईक आहे. तिथं एकही माणूस नाही. काही वेळात एक बाईक आपोआप सुरू होते आणि ती चालू लागते. बाईक सुरू होऊ टर्न घेते आणि अंतर चालतेही आणि नंतर ती जमिनीवर कोसळते.

ही घटना सीसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमधील तारखेनुसार ही घटना डिसेंबर 2020 मधील आहे. पण आता त्याचा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्यानंदेखील कॅमेऱ्यात कैद झालं नाहीतर विश्वासच बसला नसता, असं कॅप्शन दिलं आहे.

याचा खुलासा केला असता प्राथमिक अंदाजेनुसार बाईक हि रिमोटवर चालू बंद तर होत नसेल ना ? रात्रीच्या वेळी झोपेत चावी रिमोट चुकून हाताने रिमोट दाबल्याने हि गाडी सुरु आणि बंद तर झाली नसेल ना? असा प्राथमिक अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here