प्रेषित महम्मद पैगंबर बिल पास करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन…

सांगली – ज्योती मोरे

राज्याच्या विधिमंडळात येणाऱ्या अधिवेशनात प्रेषित मोहम्मद पैगंबर बिल पास करून त्याचा तात्काळ कायदा करण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते.

धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे, प्रेषित मोहम्मद पैगंबर बिल वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्द केले आहे. विधानपरिषदेचे सदस्य कपिल पाटील यांच्या माध्यमातून गेल्या अधिवेशनात सदर बिल विधिमंडळात मांडण्यात आले होते.

येणाऱ्या अधिवेशनात हे बिल मंजूर करून तात्काळ सदर कायदा लागू करण्यात यावा. यासाठीच सदर आंदोलन करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया,वंचित बहुजन। आघाडीचे सांगली जिल्हा महासचिव उमर फारूक ककमरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष महावीर कांबळे, संजय कांबळे ,चंद्रकांत खरात ,वसंत भोसले, शहानवाज सौदागर, अनिल मोरे, पवन वाघमारे, सतीश शिकलगार, शितल कोलप, विशाल धेंडे, जैलाब शेख, अशोक लोंढे ,अकील शेख ,निखिल शास्त्री, अनिल कांबळे, गौतम लोटे, आणि बाळासाहेब कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here