मंडई – मेला वरची बंदी खासदार प्रफुल्ल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मुळेच उठली : जगदीश (बालु) बावनथडे़…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

तिरोडा तालुक्यातील सुकडी़ (डाकराम) मध्ये दिवाळी व नववर्षाच्या निमित्ताने गावकरी मंडळीच्या वतिने लावनीचे कार्यक्रम आयोजित केले होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून जगदीश बावनथडे म्हणून उपस्थित जगदीश बावनथडे़ यांनी जनतेला दिवाळी व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या व सांगितले कि आजचे कार्यक्रम हे खासदार प्रफुल पटेल व राजेंद्र जैन यांच्या मुळेच आपण आयोजित करू शकलो,

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मंढई – मेला व कार्यक्रमां वर बंदी घातली होती. पण पटेलांनी याची दखल घेत बंदी उठवली, आपल्या प्रत्येक अडचणी च्या वेळेला फक्त खासदार प्रफुल पटेलच धावुन येतात दुसरे कुनीही येत नाही. म्हणून आपल्या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रफुल पटेल व राजेंद्र जैन यांना आपण साथ द्यायला हवी, येणाऱ्या काळात आपण सर्व प्रफुल पटेल व राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात संपूर्ण क्षेत्राचा कायापालट करू शकतो फक्त तुम्हा सर्वांची साथ हवी असे हि ते या वेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here