( कष्टकरी,शेतकरी,कामगार, मजुरांच्या तक्रारी वाढल्या ) ( स्वच्छ भारत अभियानाचे वाजले तीन तेरा )
बुलढाणा – अभिमान शिरसाट
बुलढाणा जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींची मुदत संपल्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना महामारी चा काळ असल्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
याबाबत सविस्तर असे की, प्रशासकाची नेमणूक झाल्यापासून जिल्ह्यातील काही अपवाद वगळता ग्रामसेवकांची मनमानी सुरू झाली आहे अशी ओरड गोरगरीब कष्टकरी कामगार वर्गाकडून होत आहे परंतु काही मग्रूर ग्रामसेवक कोरोनामुळे आधीच बेकार बेरोजगार झालेल्या कामगार कष्टकरी मजुरांना बांधकाम कार्यालयात नाव नोंदणी साठी लागणारे दाखले तसेच इतर खाजगी कामासाठी लागणारे दाखले देण्यास टाळाटाळ करीत आहे.
आधीच सहा ते सात महिन्यापासून लाकडं असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गोरगरिबांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे.आणी अपवाद वगळता मगृर ग्रामसेवक दाखले देण्यास टाळाटाळ करत आहे. कोरोना काळामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार मजूर वर्ग बेकार आणि बेरोजगार झाला आहे.या बेकारीची बेरोजगाराची चिंता व परवा न करता हे ग्रामसेवक गावकऱ्यांशी कुठलाही सन्मानवय साधत नाहीत हे विशेष! आणी ग्रामपंचायतीच्या कर वसुलीसाठी सक्ती करत आहे.
या कोरोना काळातील कठीण प्रसंगामध्ये ग्राम पंचायतीवर नेमलेले प्रशासक तसेच वरिष्ठ आधीकारी सद्ध्या गोरगरीब जनतेचे प्रश्न गांभिर्याने घेताना दीसत नाही!तसेच गावतील मुलभुत समस्येबरोबर स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा वाजले आहेत गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार व मजूर यांच्या मूलभूत प्रश्नांची दखल घेत भाजपा कामगार आघाडी चिखली तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सवडे यांनी महाव्हॉइसन्यूज प्रतिनिधिशी बोलताना सांगितले की,
काही मगृर ग्रामसेवकांची वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले यावेळी त्यांचे समवेत चिखली भाजपा शहर उपाध्यक्ष सादिक काझी, भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष रजि अहमद भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सय्यद मोबिन,संदीप वानखेडे,शारदा ताई दूतोंडे,सम्राट पवार,मंगेश गवई यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.