नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आता चार जल बोटीद्वारे प्रशासनाची करडी नजर…

महेंद्र गायकवाड
नांदेड – जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थिती व नदीतील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर करडी नजर ठेवण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने चार नवीन बोटींची इतर अत्यावश्यक साधनांसह खरेदी केली आहे. या बोटींचे आज तांत्रिक समितीद्वारे तपासणी करुन या बोटींना जिल्हा प्रशासनाच्या ताफ्यात सहभागी करून घेतले. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी या बोटींची पाहणी केली.


यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसिलदार नांदेड सारंग चव्हाण, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, अग्निशमन अधिकारी रईस पाशा आदी उपस्थित होते.


या चार बोटींपैकी दोन बोटी या नांदेड शहरासाठी तर एक बोट हदगाव तहसिल व एक बोट नायगाव तहसिलकडे सुपूर्द केली जाणार आहे. याचबरोबर या बोटीसमवेतच प्रत्येक तालुक्याला लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, सॉ कटर, रेस्क्यू रोप, मेगा फोन, फर्स्ट एड किट, फोल्डेबल स्ट्रेचर, टूल कीट इत्यादी शोध व बचाव साहीत्य दिले जाणर आहे.

प्रत्येक तहसिल कार्यालयातील दोन कर्मचारी याप्रमाणे बोट चालविण्याचे प्रशिक्षण मास्टर ट्रेनर द्वारा दिले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here