त्या आरोपींना पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली…

बेळगाव – राहुल मेस्त्री

बेळगाव जिल्ह्यातील हंचिनाळ तालुका निपाणी येथे चारित्र्याच्या संशयावरून वारंवार भांडण काढून मारहाण करत असल्याच्या संतापाने पत्नीने आपल्या भावाच्या व बहिणीच्या मदतीने पती सचिन सदाशिव भोपळे याचा जिव संपवला होता.यामुळे हंचिनाळ गाव हदरले होते व एकच खळबळ उडाली होती.

या धक्कादायक प्रकारातील आरोपी मयत झालेल्या सचिनची पत्नी अनिता सचिन भोपळे आणि सह आरोपी बहिण व तिचा भाऊ कृष्णात घाटके व नातेवाईक गणेश या आरोपींना रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी गुन्हा क्रमांक 71/2020 ने भारतीय दंड संहिता कलम 302, 201 या कलमाखाली अटक केले व घटनास्थळी जाऊन पंचनामा पूर्ण केला.

यावेळी हा गंभीर गुन्हा करताना वापरलेली काठी, दोरी पोलिसांनी जप्त केली आहे. त्यानंतर आरोपींना निपाणी येथील शासकीय महात्मा गांधी ईस्पीतळात पाठवून त्यांची कोविड 19 तपासणी करण्यात आली. या सर्व आरोपींचा अहवाल निगेटिव्ह आला. पुढे या चारही आरोपींना निपाणीतील विषेश न्यायालयात हजर केले असता.

न्यायालयाने पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार या चारही आरोपींना हिंडलगा येथील कारागृहात रवानगी केल्याची माहिती निपाणी मंडल पोलिस निरीक्षक संतोष सत्यनाईक व ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक बी. एस. तळवार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here