Tuesday, June 18, 2024
spot_img
Homeराज्यते चवताळलेले काळतोंडे माकड केले चतुर्भुज…जंगलात सुरक्षित सोडले…

ते चवताळलेले काळतोंडे माकड केले चतुर्भुज…जंगलात सुरक्षित सोडले…

तेल्हारा तालुक्यातील बेलखेड गावाचे परिसरात एका काळतोंड्या माकडाने मोठा हैदोस घातला होता. त्याने अनेक लोकांवर हल्ला चढवून त्यांना घायाळ केले होते. त्यामुळे या परिसरात या माकडाची चांगलीच दहशत निर्माण झाली होती. लहान बालके व महिला यांना तर एकटे दुकटे फिरणे कठीण झाले होते. त्यातच वन्य प्राणी संरक्षण कायदा आडवा येत असल्याने त्या माकडास कुणी प्रतिबंध ही करू शकत नव्हते.

अशा स्थितीत वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक एस. पी. राऊत, वनरक्षक चंदू तायडे, डी.जे. इंगळे, सोपान रेळे, राहुल बावणे, विकास मोरे, स्वप्नील टाले, अनिल चौधरी यांनी अथक प्रयास करून या काळतोंड्या माकडास पकडण्यात यश मिळविले. पकडल्यानंतर या माकडास पेयजलाची व्यवस्था असलेल्या जंगलातील ठिकाणी सुरक्षित सोडून देण्यात आले आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: