राज्यातील ठाकरे सरकार हटवून राष्ट्रपती शासन लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली….

न्यूज डेस्क – राज्यात राष्ट्रपती शासन लागू करण्यासाठी धडपडत असलेल्या भाजपच्या स्वप्नावर सर्वोच्च न्यायालयाने पाणी फेरले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे म्हटले आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षांकडून राज्य सरकारच्या प्रत्येक कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण व मुंबईतील घटनांना अनुसरुन ही याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबईतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुंबईतील काही मुद्दे लक्ष्य ठेऊन राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांवरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

न्यायालयाने आज या याचिकेवर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नसल्याचे म्हटले. तसेच, केवळ मुंबईतील घटनांवरुन राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येणार नाही. महाराष्ट्र राज्य किती मोठे आहे, हे तरी तुम्हाला माहिती आहे का? असे म्हणत याचिकाकर्त्याला न्यायालयाने सुनावले. सरन्यायाधीश बोबडे यांनी ही याचिका फेटाळत याचिकाकर्त्यांना फटकारले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here