Thursday, November 30, 2023
Homeराज्यराज्य महामंडळ च्या बसेस ची भयाण दुरावस्था…

राज्य महामंडळ च्या बसेस ची भयाण दुरावस्था…

Spread the love

राज्य परिवहन महामंडला कुणी वाली शिल्लक राहिलाय का?

भिवंडी – प्रफुल्ल शेवाळे

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी बस स्थानकामधून बस क्रमांक MH-14 BT 4921 भिवंडी – कल्याण – नगर या बस चं अतिशय विदारक दृश्य पहायला मिळालं.

या बस मधील सीट हे चक्क तुटलेल्या, मोडलेल्या अवस्थेत होते.. कुठे सीट कव्हर फाटलेले दिसत होते. खरोखर प्रवाशांच्या जीवाशी जणू खेळ चाललाय असंच चित्र नजरेस पडत होते. बसच्या या अवस्थेबद्दल बस कंडक्टर ला विचारलं असता… आम्ही ठरलो नोकर वर्ग.. आम्ही काय करणार. असं उत्तर ऐकायला भेटलं.. दोन दिवसापूर्वी एका बस प्रवाशी मित्राने या बस मधून प्रवास करीत असता सदर माहिती दिली आहे..

खरोखर राज्य परिवहन महामंडळ, प्रशासन याबाबत काही खबरदारी घेईल की हे असंच चालत राहणार असा गहन प्रश्न बस प्रवाशांना पडल्याशिवाय राहणार नाही. यातून राज्य परिवहन महामंडळाला कुणी वाली शिल्लक राहिलाय का असा प्रश्न आपसूक येईल यात शंका नाही.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: