मुलीचे प्रेमप्रकरण…रागाच्या भरात वडिलांच्या हातून घडले भयानक कृत्य…

न्यूज डेस्क – उत्तर प्रदेशमधील लखनौपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या पंडेयटारा गावात बुधवारी सकाळी रस्त्यावर एका व्यक्तीच्या हातात कापलेले मुंडके दिसले तेव्हा लोक घाबरून गेले. त्या व्यक्तीने आपल्या 17 वर्षाच्या मुलीचे मुंडके हातात धरलेले होते यामुळे खळबळ उडाली.

हरदोई जिल्ह्यातील माझीला पोलिस स्टेशन भागात ही घटना घडली. सर्वेश कुमार असे या व्यक्तीचे नाव असून स्वत: आपल्या मुलीचे शिरच्छेद करुन तिची हत्या केली असल्याचे कबूल करून त्याने पोलिसांना सांगितले की आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाबद्दल तो नाराज आहे म्हणून त्याने तिला ठार मारले.

जेव्हा त्याने पोलिस स्टेशन गाठले तेव्हा दोन अधिका्यांनी त्याचा व्हिडिओ बनवून त्याचे नाव विचारले. त्याला त्याच्या ठावठिकाणाबद्दल विचारणा करून आणि त्याने कोणाचे डोके हातात पकडले आहे हे देखील विचारले. या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वेश कुमार यांनी न डगमगता दिली.

व्हिडिओमध्ये तो कबूल करतो की त्याने आपल्या मुलीचे डोके धारदार शस्त्राने कापले आहे कारण त्याच्या मुलीचे तरुणाशी प्रेमसंबंध असल्याबद्दल मिळाल्याने त्याचा राग होऊन त्याने संतापाच्या भरात त्याच्या हातून हे कृत्य घडल्याचे त्याने कबूल केले. व तिचे पार्थिव धड खोलीत असल्याचे सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here