भरधाव टेम्पो-कंटेनरचा भीषण अपघात…अपघातात १० जण ठार…१६ जण जखमी…

न्यूज डेस्क – गुजरात राज्यातील वडोदरा राष्ट्रीय महामार्गावर भरधाव टेम्पो आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी आहे. जखमीला जवळच्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. सूरत येथील एक कुटुंब आपल्या नातेवाईकांसह पावगड इथं दर्शनाला जात होते. वडोदरा राष्ट्रीय महामार्गावरील वाघोडिया चौकात पोहोचले असता भरधाव आयशर टेम्पो आणि कंटेनरची समोरसमोर जोरात धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता की, यात टेम्पोचा समोरच्या भागाचा चुराडा झाला. टेम्पोमध्ये समोर बसलेले तरुण जागीच ठार झाले. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर 16 जण जखमी झाले आहे. सर्वजण हे सूरत येथील राहणार होते.

या भीषण अपघातामुळे महामार्गावर रक्ताचा सडा आणि जखमी व्यक्तींच्या आक्रोशामुळे परिसरात सून्न झाला होता. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने सयाजी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या भीषण अपघाताबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी यांनीही ट्वीट करून तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. जखमींना तातडीने मदत मिळावी अशी सूचना प्रशासनाला केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here