दहावीचा निकाल जाहीर…कोकणाचा निकाला १००% तर संपूर्ण राज्याचा ९९.९५ टक्के

न्यूज डेस्क – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर केला आहे. इयत्ता १० वी चा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. कोरोनाच्या संकटामुळे १० वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. राज्य शिक्षण मंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

१०ची सर्व विद्यार्थी दुपारी एक वाजता विद्यार्थी निकाल ऑनलाइन पाहू शकणार आहेत. दहावीच्या निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० टक्के निकाल लागला आहे. राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २०२१ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

यंदा या परीक्षेसाठी आठ माध्यमांतील ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ७८ हजार ६९३ मुली असे एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ती रद्द करण्यात आली.

इयत्ता १०वीच्या परीक्षेत पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान ३५ टक्के गुण आवश्यक असतात, मात्र अंतर्गत गुणांच्या मूल्यमापनावर २० टक्के गुण मिळणारे विद्यार्थीही उत्तीर्ण असतील. ज्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्यांना गुणपत्रक दिले जाईल जे विद्यार्थ्यांद्वारे त्यांच्या शाळांमधून दिले जाऊ शकते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल १ वाजता जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in,mahahsscboard.in वर उपलब्ध होणार आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here