सांगा आता ! लग्नाच्या स्टेजवर नवऱ्याला विचारते की जुन्या बॉयफ्रेन्ड ची मिठी घेवू का?…

न्यूज डेस्क – आपला जुना बॉयफ्रेन्ड किंवा गर्लफ्रेन्ड आपल्या लग्नात दिसली तर आपली अवस्था काय होईल, याची कल्पनाही करता येत नाही, प्रत्येक नात्याला प्रतिष्ठेशी जोडण्याची रित आहे.

अशावेळी नात्यांना ओरबाडून घेण्याऐवजी फुलासारखं जपणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका लग्नात नवरीचा बॉयफ्रेन्ड आलेला आहे. यावेळी एकमेंकांकडे पाहून नाक आणि तोंड मुरडण्याऐवजी दोघांनी एकमेकांना मिठ्ठी मारली आहे. निखळ नात्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच पसंत केला जात आहे.

ही घटना इंडोनेशियातील आहे. यावेळी एका जोडप्याचं लग्न होतं. या लग्नात नवरीचा जुना बॉयफ्रेन्ड आलेला आहे. यावेळी त्याला पाहून नवरीला खूप आनंद झाला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता. जुना बॉयफ्रेन्ड आल्यानंतर त्याने नवरीला हॅन्डसेक करण्यासाठी हात पुढे केला आहे.

त्यावेळी नवरीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याकडे त्याला शेवटची मिठ्ठी मारण्यासाठी परवानगी मागितली. यावेळी नवरदेवानेही खुल्या मनाने तिला परवानगी दिली. त्यानंतर नवरदेवानेही होणाऱ्या बायकोच्या जुन्या बॉयफ्रेन्डला मिठ्ठी मारली आहे.

संबंधित प्रसंगाचा व्हिडिओ नवऱ्या मुलीने तिच्या टीकटॉक अकाऊंटवर शेअर केला आहे. खरंतर हा व्हिडीओ खूप गोड आहे. अनेकांनी पसंत केला आहे. पण याच्यावर मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी नवरीने धोका दिल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी नवरदेवाच्या खुल्या विचारांचं स्वागत केलं आहे.

एका यूडरने लिहिलं की, ‘चेहरा खोटं बोलत नसतो, नवरदेवाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसत आहे, पण ठीक आहे.’ तर दुसऱ्या एका वापरकर्त्यानं लिहिल की, ‘व्हिडिओतील नवरीला आपल्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल अजिबात आदर नाहीये, तिने नवऱ्यासमोर परपुरुषाला मिठी मारायला नको होती.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here