तेल्हारा पंचायत समिती बी. डी. ओ. कोरोना पॉझेटिव्ह…

तेल्हारा – विकास दामोदर

पश्चिम विदर्भात सध्या कोरोनाने कहरच केला आहे, त्यातही अकोला जिल्ह्यात कोरोनाचे दिवसांगाणिक कोरोना रुग्ण वाढताहेत, यातच मागील आठवड्यात अकोला जिल्ह्यातील दोन पंचायत समितीचे बी. डी. ओ. कोरोना पॉसिटीव्ह निघालेत, त्यामुळे अकोटचा बी. डी. ओ चा प्रभार तेल्हारा येथे. नुकतेच रुजू झालेले सहाय्यक बी. डी. ओ. बारगिरे साहेबांकडे देण्यात आला.

तेल्हारा पंचायत समितीत सुद्धा बी. डी. ओ. पदाचा प्रभार कृषी अधिकारी बी. जे. चव्हाण साहेबांकडे आहे. दि.2/3/2021 च्या रिपोर्ट नुसार बी. डी. ओ. बी. जे. चव्हाण साहेब देखील कोरोना पॉसिटीव्ह निघालेत, विशेष म्हणजे पंचायत समिती, तेल्हाऱ्याच्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांचे कोव्हीशिल्ड लसीकरण करण्यात आले. तरी देखील बी. डी. ओ. साहेब पॉसिटीव्ह निघालेत, सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडतो की या लसीचा काही फायदा आहे की नाही.

आम्ही लोकांना आवाहन करतो या लसीबाबत बहुतांश लोकांना ही लसीचा फायदा ताबडतोब होतो तर काही लोकांना तो उशिरा होतो. तरी साहेबांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी. शक्यतोवर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, नियमित हात स्वच्छ धुवा, सुरक्षित अंतर पाळा, मास्कशिवाय घराबाहेर पडूच नका. हेच सध्या कोरोनावर मात करण्यासाठी प्रभावी उपाय आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here