तेल्हारा पालिकेच्या अध्यक्षांनी बेकायदेशीर सभा घेतल्याचा आरोप करून विरोधातील पाच नगरसेवकांनी केला सभात्याग…

तेल्हारा – गोकुळ हिंगणकर

तेल्हारा नगरपालिकेच्या अध्यक्षांनी दिनांक ८ जुलै ला बोलाविलेली विशेष सभा ही बेकायदेशीर सभा असल्याची लेखी तक्रार मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा यांच्याकडे करून विरोधी गटातील ५ नगरसेवकांनी सभात्याग केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

दिनांक ८ जुलैला तेल्हारा पालिकेच्या नगराध्यक्षांनी विशेष सभा बोलली होती या सभेची सूचना दि .६ जुलै रोजी काढण्यात आली असून एक दिवसांपूर्वीच ७ जुलै ला लेखी नोटीस देण्यात आली ही विशेष सभा म्हणून दाखविण्यात आली असून विशेष सभेची सूचना तीन दिवसापूर्वी देणे आवश्यक व कायदेशीर आहे परंतु आम्हास एक दिवसापूर्वी सूचना देण्यात आली सभेतील विषय हा आपत्कालीन नसून एक दिवसापूर्वी देण्यात आलेल्या सभेची सूचना बेकायदेशीर आहे.

आम्हास इतक्या कमी कालावधीत या विषयाची चौकशी करुन अभ्यास करणे आम्हाला शक्य नाही तसेच विशेष सर्वसाधारण सभेचे नाव टाकून या सभेकरिता आपत्कालीन तातडीचे सभेचे नाव देवून या सभेकरिता आपत्कालीन तातडीचे सभेचे नियम पालन करण्यात आले असल्यामुळे ही सभा बेकायदेशीर नियमबाह्य असून या सभेत होणारे ठराव सुद्धा कायदेशीर म्हणता येत नाहीत करिता या सभेतील ठरावाची अंमलबजावणी न करता ही सभा बेकायदेशीर म्हणून रद्द करण्यात यावी व पुन्हा सदस्यांना नियमाचे पालन करून योग्य वेळ देण्यात येऊन सभा बोलविण्यात यावी अशा प्रकारची लेखी पत्र तेल्हारा नगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते मितेश मल्ल,

नगर परिषद सदस्य गोवर्धन पोहरकार ,सौ अरुणा मंगेश ठाकरे सौ दिपाली नीलेश धनभर , सौ सुनीता शेखर भुजबले या पाच सदस्यांनी मुख्याधिकारी यांना पत्र देऊन दिनांक ८ जुलैला घेण्यात आलेल्या विशेष सभे मध्ये सभात्याग केला तेल्हारा पालिका अध्यक्षांनी घेतलेल्या बेकायदेशीर सभेबाबत आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन अमरावती व जिल्हाधिकारी अकोला यांना सुद्धा कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here