Thursday, June 1, 2023
Homeकृषीतेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर वंचितच्या सभापती सह मित्रपक्षांचा झेंडा...

तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर वंचितच्या सभापती सह मित्रपक्षांचा झेंडा…

तेल्हारा – गोपाल विरघट

आज दि.२३/५/२०२३ रोजी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत श्रद्धेय बाळासाहेबांच्या कृपेने गरीब कुटुंबातील सुनील इंगळे यांना सभापती पद बहाल केले तर शेतकरी सहकार पॅनल महाविकास आघाडीचे प्रा. प्रदिप ढोले हे उपसभापती पदी विराजमान झाले.

सदर निवणुकीत शेतकरी भाजपा चे हरिदास वाघ यांनी सभापती पदा करिता तर निरंजन राजनकर यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला होता तर बहुमताने विजयी झालेल्या पॅनलच्या वतीने सभापती पदाकरिता वंचितचे सुनील इंगळे तर उपासभापती पदासाठी प्रा. प्रदिप ढोले यांनी अर्ज दाखल केला परंतु आपल्या कडे पुरेशे बहुमत नसल्यामुळे शेतकरी भाजपा पॅनलने आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेतले,

परिणामी वंचित बहुजन आघाडीचे सुनील इंगळे सभापती तर शेतकरी सहकार महाविकास आघाडीचे प्रा. प्रदीप ढोले बिनविरोध निवडून आले, जसा निकाल जहीर झाला तसा संचालक मंडळ डॉ. अशोक बिहाडे, दामोदर मार्के, विजया ताथोड, वंदना वाघोडे, श्याम घोंगे, मोहन पाथ्रीकर, रवींद्र बिहाडे, गौरव यादगिरे कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

सदर निवडणुकी साठी निवडणूक अधिकारी म्हणून एस. डब्लू.खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी काम पहिले सोबतच या हर्ष उल्हासात अकोला येथून जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष प्रमोदभाऊ देंडवे, महासचिव मिलिंदभाऊ इंगळे ओ बी सि. नेते ऍड. संतोष रहाटे, जि. प.अध्यक्षा सौ. संगीता अढाऊ,.ता अध्यक्ष अशोक दारोकार , सहकार नेते सुरेश तराळे,

प्रा. सुधाकर येवले, एड.गजानन तराळे,माजी उपसभापती अरविंद अवताडे गोपाल कोल्हे, अनंत अवचार,सैफुल्ला भाई, सुभाष रौदळे,प्रकाश खोब्रागडे पं. स. सभापती सौ. आम्रपाली गवारगुरू, ता. महासचिव मधुसूदन बरिंगे, ,, जिया शाह, संदीप गवई, विकास पवार, अनंता इंगळे,,, प्रदिप तेलगोटे,

जीवन‌ बोदळे, पंजाब तायडे, प्रसिद्धी प्रमुख सिद्धार्थ गवारगुरू, प्रा. विकास दामोदर, दीपक गवारगुरू, सुरेंद्र भोजने, मिलिंद दांडगे, मिलिंद वानखडे, संदीप गवई, धम्मपाल वाकोडे, संदीप कांबळे, राजिक शाह,

अरविंद तिव्हाणे,रोशन दारोकार,खंडुजी घाटोळ, मो. सलीम,सदानंद खारोडे, आनंद बोदळे, अनंत अहेरकर, रामाभाऊ फाटकर,सादिक भाई,मोईन खान, राजु भाकरे, राजु ढोले, रवींद्र खर्चे तथा बहुतांश कार्येकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: