तेलंगणाच्या घनकचरा महाराष्ट्राच्या नदीपात्रात; तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष…

बिलोली – रत्नाकर जाधव

महाराष्ट्र व तेलंगणा या दोन्ही राज्याच्या सीमेवर असलेली परंतु महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या मांजरा नदी पात्रात तेलंगणातील घनकचऱ्याचे डंपिंग हाऊस बांधले आहे.परंतु त्याचाही वापर न करता तेलंगणातील घनकचरा थेट नदी पात्रात टाकला जात आहे.त्यामुळे नदी प्रदुर्शित होत आहे.

तरीही बिलोलीच्या उप विभागीय अधिकारी व तहसील विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.तेलंगणाने सीमावादात नेहमीच महाराष्ट्रावर कुरघोडी केली आहे.महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमावादात नेहमीच तेलंगणाने महाराष्ट्रावर कुरघोडी केली आहे.

मग तो बाभळी बंधारा असो की सलूरा व खंडगाव जॅकवेल असो तेलंगणाने आपला वर्चस्मा दाखवला असतांना मात्र महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी असो की शासकीय अधिकारी यांनी मात्र गांभीर्याने घेतलेच नाही.

त्यामुळे तेलंगणा प्रशासनाकडून महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या नदीपात्रात चक्क घनकचरा साठवण्यासाठी डम्पिंग हाऊस शेड उभारले आहे.परंतु याकडे बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय मधील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले नाही.

त्यामुळे या नदीपात्रात उभारलेल्या डंपिंग हाऊस मध्ये घनकचरा जमा न करता मांजरा नदीच्या जुन्या पुला लगत उघड्यावर कचरा टाकून नदीपात्र दूषित केले जात आहे.एवढा गंभीर प्रकार होत असतांना ही बिलोलीचे उपजिल्हाधिकारी व तहसीलदार मात्र “गांधारी”ची भूमिका घेत आहेत असा आरोप येसगी येथील गावकऱ्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here