नांदेड – महेंद्र गायकवाड
काँगेसच्या एका अतिउत्साही कार्यकर्त्याने बिलोलीचे नूतन तहसीलदार यांचा आमदार व काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वागत केल्याचे फोटो सोशल मिडियावर टाकले परंतु आपण ज्या अधिकाऱ्यांचे स्वागत करतो त्यांचे नाव ही त्या कार्यकर्त्याला माहीत नाही.त्यामुळे सोशल मीडियावर तहसीलदार वाघमारे की गायकवाड या बदल चर्चा होत असून अनेकांनी त्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर झटपट पोस्ट टाकून आपली वाह वाह करून घेणे व नेत्यांकडून आपली पाठ थोपटून घेणे असा प्रकार प्रत्येक पक्षात वाढला असून स्पर्धेच्या युगात सोशल मीडिया हे प्रसिद्धीच मोठं साधन मानलं जातआहे.केवळ प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो.
केवळ झटपट आपली प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने अनेकजण सोशल मीडियावर टाकतात.पण कधी कधी आपण काय टाकतो व काय लिहतो याचे ही भान कांहीजनांना राहत नाही.अशीच प्रचिती एका काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पहावयास आली.
बिलोली येथे नुकतेच बदली होऊन आलेले तहसीलदार कैलास वाघमारे यांचे स्वागत आ.रावसाहेब अंतापुरकर व कॉंग्रेस कमिटीचे बिलोली तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर,प्रीतम देशमुख यांनी केले.
व स्वागत केलेले फोटो झटपट सोशल मीडियावर टाकण्याच्या नादात मात्र त्या काँग्रेसच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांने तहसीलदार वाघमारे ऐवजी तहसीलदार गायकवाड असे सोशल मीडियावर टाकल्याने अनेकांना संभ्रम निर्माण झालेल्या विविध ग्रुपवर टाकलेल्या त्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया पहावयास मिळत आहेत.