बोदवड सिनेअभिनेत्री कंगना राणावत च्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी च्या वतीने तहसीलदार हेमंत पाटील यांना निवेदन सादर…

बोदवड – गोपीचंद सुरवाडे

सिने अभिनेत्री कंगना राणावत यांच्या निषेधार्थ शिवसेना महिला आघाडी बोदवड चे वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.निवेदन वजा इशारा देण्यात येतो की, हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत मुंबईत पोट भरण्यासाठी येतात व इथेच नावारूपाला येतात.गडगंज संपत्ती कमावतात हे करीत असताना यांच्यावर सतत अंडरवर्ल्ड ची दहशत असते.

मात्र मुंबई पोलिसांच्या सुरक्षेच्या कडेकोट कवचात वाढत असलेली अनेक कलावंत इथे सुरक्षित रित्या मोकळा श्वास घेत असतात. याबद्दल अनेक प्रसिद्ध कलावंत पोलिसांच्या कार्याचे उघड उघड कौतुक देखील करीत असतात.

मात्र गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपट सृष्टीत मुंबई नावारूपास आलेली मात्र इथल्या कर्मभूमी बद्दल जाण नसलेल्या कंगना राणावत या नटीने सोशल मीडियावर ट्विट केले आहे की ‘खरंतर गुंड आणि मुव्ही माफियांपेक्षा मला आता मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला एकतर हिमाचल प्रदेश सरकारची किंवा थेट केंद्राची सुरक्षा हवी आहे.

मुंबई पोलिसांची नको, प्लीज,’ असं संताप जनक वक्तव्य केले आहे. याबद्दल कंगणाला शिवसेना नेते संजय राऊत यांनी खडेबोल सुनावले आहे.या मुजोर नटीने सेना नेते व मुंबई पोलीस तसेच महाराष्ट्र राज्यावर अविश्वास दाखविल्याने या नटीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.तसेच या नटीबद्दल महाराष्ट्र राज्यातील नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून आज शिवसेनेच्या वतीने कंगना राणावत या नटीचा पुतळा जाळून तीव्र निषेध आंदोलन आज ठीक वाजता करण्यात येत आहे.

याची प्रशासनाने नोंद घ्यावी.सुनीता पाटील,अर्चना खोडके, मनीषा कोळी,परवीण बी शेख,सुनंदा गुराचाल, पूजा माली,सुमित्रा माली, आशा माली,बेबाबाई माली ,सुमन सूर्यवंशी,सुरेखा सुतार, रांजना डिके, लता मली,उषा माळी ,अनिता माळी, निर्मला माळी,कुसुम सूर्यवंशी, मुक्ता बाई सूर्यवंशी, ज्योती चांदनकार,प्रमिला कोळी,रुबिनबी शेख, हुसेनबी शेख,भागाबाई माळी, महिला पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here