नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ चित्रपटाचा टीजर रिलीज…

न्युज डेस्क – विदर्भात चित्रित झालेला नागराज मंजुळे यांचा अमिताभ बच्चन सोबत स्टारर ‘झुंड’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये बिग बी त्यांच्या ‘झुंड’सोबत दमदार दिसत आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिताभ लहान मुलांच्या टोळीसोबत दिसत आहेत. अमिताभ बच्चन सोबत या चित्रपट मध्ये अंकुश गेडाम, बाबू क्षत्रिय, आकाश ठोसर, सायली पाटील,रिंकू राजगुरू, सोमनाथ अवघडे, आशिष खचणे, जेरिको रॉबर्ट, एंजेल अँथनी, कार्तिक उईके, जसप्रीत सिंह रंधा, तानाजी गालगुंडे, बॉबी रोपाल, ऍलन पॅट्रिक,

निराज जामगडे, सूरत लिंबू, सदानंद स्वामी, राजिया काझी, बादल सोरेन, सोहान दुर्वे, रिहान शेख, ऋषभ बोधाची, सरवन जे, योगेश उईके, अंकित बानवले, चिराग शर्मा, जस्किरथ सिंह विज, सौरभ अभ्यंकर, सचिन मेश्राम, विशाखा उईके, सौरभ शर्मा, निकसन डिकोस्टा, खेलचंद्र हेमाम, निखिल गणवीर, अरबाज शेख, किरण ठोके अधिक अन्य कलाकार पण आहेत. हा चित्रपट नागराज पोपटराव मंजुळे यांच्या हिंदी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. ‘सैराट’ आणि ‘फँड्री’ या मराठी ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी तो ओळखला जातो.

झुंडच्या संदर्भात अनेकवेळा ओटीटी रिलीज झाल्याची चर्चा रंगली आहे. झुंडची कथा ‘स्लम सॉकर फाउंडेशन’चे संस्थापक आणि प्रशिक्षक विजय बारसे यांच्या कथेवर आधारित आहे. झोपडपट्टीतील फुटबॉलपटू बनलेल्या अखिलेश पॉलचेही ते प्रशिक्षक होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन विजय बरसे यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती टी-सीरीज, तांडव फिल्म्स एंटरटेनमेंट आणि आटपाट यांच्या बॅनरखाली झाली आहे आणि संगीत अजय -अतुल चे आहे.’झुंड’ ४ मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here