फरहान अख्तरचा पॉवर पॅक चित्रपट ‘तूफान’ चा टीझर रिलीज…

न्युज डेस्क – फरहान अख्तरच्या आगामी ‘तूफान’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, तो येताच चाहत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. या टीझरकडे बघून कोणीही म्हणू शकते की फरहान अख्तरची अभिनयशैली मन जिंकण्यात सक्षम आहे. टीझरमध्ये फरहान अख्तर बॉक्सर खेळाडू होण्यासाठी घाम गाळताना दिसत आहे.

फरहान अख्तरबरोबरच या चित्रपटातील मृणाल ठाकूर आणि परेश रावल यांच्या अभिनयाचेही कौतुक करण्यासारखे आहे. काही तासापूर्वी रिलीज झालेला हा टीझर आतापर्यंत ६० हजार वेळा पाहिलेला आहे.

फरहान अख्तर अमेझोन प्राइम वीडियो च्या तूफान या आगामी चित्रपटामध्ये डोंगरी येथील गुंडाची भूमिका साकारत आहे, जो नंतर राष्ट्रीय स्तराचा बॉक्सर बनतो. या चित्रपटात मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर आणि हुसेन दलाल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित या टीझरमध्ये फरहान अख्तरसोबत वादळी जगाची झलक शेअर केली आहे आणि यामुळे चाहत्यांना अधिक अपेक्षा वाटली आहे. हा पॉवर पॅक टीझर चित्रपटातील स्फोटाची केवळ एक छोटीशी झलक आहे.

फरहान अख्तरचा हा ‘तूफान’ फिल्म ‘यावर्षी २१ मे रोजी अमेझोन प्राइम व्हिडिओवर रिलीज होईल. विशेष म्हणजे या चित्रपटाचे एकत्रित प्रदर्शन भारतासह सुमारे २४० देशांमध्ये एकत्रित केला जाईल. केसेल एंटरटेनमेंट आणि रॉमपी (ROMP) पिक्चर्सच्या बॅनरखाली अमेझोन प्राइम व्हिडिओ निर्मित या चित्रपटाची निर्मिती रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here