पातुर येथील बोडखा जंगलात वनकर्मचार्यावर सागवान चोरट्यांची दगडफेक !वनकर्मचारी किरकोळ जखमी…

पातुर – निशांत गवई

परीसरातील जंगलामध्ये १३ आक्टोबर रोजी मा. श्री. डी.डी. मदने, वनपरिक्षेत्र अधिकारी पातूर यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पातूर वनपरिक्षेत्रा मधील काही वन कर्मचारी यांना तात्काळ बोलावून नियोजन बध्द पध्दतीने टिम तयार करुन वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांचे सोबत राहून बोडखा वर्तुळामधील चिंचखेड बीट मधील वन खंड क्र. ७१ मध्ये रात्री १२:३० वा. पासून अंबूश लावून बसलेले असता मोक्यावर पहाटे ०४:००

वाजता अज्ञात चोरट्यांनी मौल्यवान साग वृक्ष कटाई करण्याचा कुन्हाडीचा आवाज ऐकताच काही वनकर्मचारी आवाजाच्या दिशेने गेले असता रात्रीच्या काळोखाचा (अंधराचा) फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी वनरक्षकांवर दगडफेक करुन हमला केल्याची घटना झालेली असून त्या चकमकीत वनरक्षकांना किरकोळदुखापत झालेली आहे. यामध्ये एक महिला वनरक्षक नामे कु.अर्जना जनार्धन चिंचखेडे, वनरक्षक चिंचखेड भाग-२ ह्या होत्या.

घटनास्थळावरून आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळावर एकूण १६ नग सागवान चौरस वनपरिक्षेत्र अधिकारी पातूर यांनी जप्त केला आहे. सदर कार्यवाही मध्ये श्री.व्ही.एस. लेंडाळे ,श्री.आर.के. बोराळे,कु.ऐ.जे. चिंचखेडे,ईतर वनकर्मचारी उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here