दर्यापूर येथील जे. डी. पाटील महाविद्यालयातील दोन शिक्षकासह एका शिक्षिकेचा मुलाला कोरोनाची लागण…

तरी मात्र विद्यालय विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी : रुग्ण संकेत वाढ होण्याची शक्यता…

दर्यापूर – किरण होले

अमरावती जिल्ह्यामध्ये दररोज कोरोना च्या रुग्ण संख्या मध्ये वाढ होत आहे. मागील 1 वर्षापूर्वी संपूर्ण देशावर कोरोनाने हाहाकार झाल्याने देश संपूर्ण देशी लोक करण्यात आले होते. व आज त्या घटनेला तब्बल एक वर्ष होत असून आज पुन्हा कोरोना रुग्णात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढ होत असल्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दोन आठवडे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. व जो कोणी बिना माक्स शहरात फिरताना दिसेल त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले आहे.

परंतु शासनाचे नियमाचे कुठलीही पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. दर्यापूर शहरातील सर्वात मोठे महाविद्यालय म्हणून ओळखला जाणाऱ्या जे डी. पाटील महाविद्यालयांमध्ये आज दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून एका शिक्षिकेचे मुलगा सुद्धा पॉझिटिव्ह आढलेला आहे. मात्र तरीसुद्धा महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

सोशल डिस्टंसिंग चा पुरेपूर सध्या या ठिकाणी उडालेला दिसून आलेला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये महाविद्यालयातील रुग्ण संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. या गंभीर बाबीची दखल घेत विद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालय बंद करू कुणालाही विद्यालयात प्रवेश देऊ नये तरच रुग्ण संख्येत वाढ होण्यास कमी होईल.

पोलीस प्रशासन नगरपालिका प्रशासन व महसूल प्रशासनाने शहरातील बिना माक्स फिरणार्यावर, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेल अशा ठिकाणावर तातडीने कारवाई करावी अन्यथा दर्यापूर शहरात कोरोना विस्पोट मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here