शासकीय इंलेमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परिक्षा लवकर घ्याव्यात या मागणीसाठी सांगली जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…

सांगली – ज्योती मोरे

शासकीय इलेमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा डिसेंबर महिन्यात घेण्यात याव्यात, तसेच शाळा तिथं कलाशिक्षक नेमावा, संच मान्यतेमध्ये कला शिक्षकांचे नाव आले पाहिजे. या मागण्यांसाठी आज सांगली जिल्हा कलाध्यापक संघाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

दर वर्षी सप्टेंबर महिन्यात सदर परीक्षा होत असतात. दहावीच्या पूर्वपरीक्षा जानेवारीमध्ये होत असतात.इलेमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षा जर डिसेंबर महिन्यात झाल्या तरंच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. परंतु शासनाचा सदर परीक्षा घेण्यासंदर्भात अजूनही विचार दिसत नाही.

लवकरात लवकर या परीक्षा घ्याव्यात आणि विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे. ही आमची मागणी असल्याची प्रतिक्रिया जिल्हा कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत माळी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.

दरम्यान मागील दोन वर्षांपासून कोरूना मुळे शाळा कॉलेज बंद असल्याने परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून बोर्डामार्फत गुण देण्यात आले होते परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यावर्षी दिवाळीपूर्वीच शाळा कॉलेज सुरू झालेले आहेत.

परीक्षाही घेण्यात येत असल्याने सदर परीक्षाही घेण्यासंदर्भात कला संचालक परीक्षा नियंत्रक आणि कला निरीक्षण कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले होते परंतु संबंधित कार्यालयांकडून परीक्षा घेण्यासंबंधी कोणत्याही प्रकारची पावले उचलली गेली नसल्याने आज हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी कार्यवाह सुभाष शिंदे, संजय रोकडे, कार्याध्यक्ष मोहन दिंडे, उपाध्यक्ष राजा ठोके, कोषाध्यक्ष प्रकाश गुजले, महिला प्रतिनिधी वंदना हुलबत्ते ,स्वरूपा पाटील, उत्तम पाटील, रामचंद्र दीक्षित, बी एच नरळे, सागर सगरे, सागर जाधव, प्रसन्न कोरे, संजय नलवडे, संतोष शिंदे, संतोष ढेरे, नरेंद्र पाटील, संदीप कदम,राम फळके,सुधीर सोनार,प्रविण पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here